>>अंबादास गवंडी
कमी तिकटीदर असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या जास्त आहे. सध्या सण, उत्सव सुरू असल्याने रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेच्या सर्व गाड्यांना वेटिंग आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवासाची तयारी करणाऱ्यांना तिकीट मिळत नाही. तिकीट न मिळाल्याने जनरल तिकीट काढून आरक्षण डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅडव्हान्स तिकीट काढून आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना जनरल तिकीटधारक आणि फुकटे प्रवासी डोकेदुखी ठरत आहेत.
दररोज अनेक गाड्यांमधून हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. आरामदायी प्रवास व्हावा, यासाठी अनेकजण आरक्षित तिकीट काढतात. मात्र, आरक्षित तिकीट मिळूनही अनेक प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत आहे. आरक्षित तिकीट नसलेले प्रवासी, प्रतीक्षा यादीतील प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये शिरत असून, रेल्वे डब्यात जिथे जागा मिळेल, तिथे हे प्रवासी बसत आहेत. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. परंतु याला अशा साधारण | आणि फुकट्या प्रवाशांकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. प्रवासात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रवाशांकडून दंड आकारला जातो. परंतु फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी न होता, ती वाढत आहे. त्यामुळे आरक्षणधारक प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाला असे फुकटे प्रवासी डोकेदुखी ठरत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा मोहीम आखून अशा प्रवाशांवर कारवाई करून लाखो रुपये दंड वसूल करण्यात येतो. तरीही ही कारवाई कुचकामी ठरत आहे.
दीड वर्षात लाखोंवर कारवाई…
रेल्वे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून अशा जनरल आणि फुकट्या प्रवासी आरक्षण डब्यातून प्रवास करताना आढळल्यास दंड आकारला जातो. पुणे विभागात गेल्या दीड वर्षात एक लाख १२ हजार ६०६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा कोटींपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही अशा प्रकारचा प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी न होता, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन बंदोबस्त करताना महिना कारवाई दंड वसूल एप्रिल मे १४४६३ ९३,९०,५९० ८४७० ५११०१६५ जून ४८२८ १२३४ २८२१०७७ जुलै ४९८५३० ऑगस्ट २३७९ ९२०७५५ सप्टेंबर २९८६ ११५०६०० एकूण ३४३६४ १९८९१७१७ दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत प्रमाण जास्त.. हतबल झाले आहे.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत प्रमाण जास्त..
दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत ऐनवेळी गावी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. रेल्वेकडून विशेष मोहीम आखून अशा प्रवाशांची तपासणी करण्यात येते. गेल्या सहा महिन्यांत पुणे विभागात ३४ हजारांवर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वात जास्त १६ हजार प्रवासी आढळले आहे.
प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करावा. जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करणे, विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वेकडून कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी.