
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मध्य रेल्वेच्या अधिकाऱयाची 10 लाख 75 हजार रुपयांच्या फसवणूक झाली. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे भांडुप येथे राहत असून ते मध्य रेल्वेत सिनिअर इंजिनीअर म्हणून काम करतात. पह्नवर आलेल्या मेसेजमधून एका ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपवर शेअर गुंतवणुकीच्या होत असलेल्या चर्चेवर विश्वास ठेवून त्यांनीही अॅप्स डाऊनलोड करून 10 लाख 75 हजार रुपये विविध खात्यात ट्रान्स्फर केले. जमा रकमेवर 17 लाख रुपयांचा नफा झाल्याचे अॅप्सवर दिसले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रक्कम निघाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.





























































