रेल्वे प्रवासी संघटनांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

202

मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांचे वारंवार घसरणारे वेळापत्रक, एमयूटीपीचे रखडलेले प्रकल्प याचा लाखो प्रवाशांना दररोजचा होणारा त्रास पाहून उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघटनेच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाडय़ा दररोज 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नाहक फटका बसत आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या वतीने आझाद मैदान मंगळवारी दुपारी रेल्वे प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून लोकल प्रवास करीत सीएसएमटी स्थानक गाठले आणि रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. सुखद, सुरक्षित आणि संरक्षित रेल्वे प्रवास हा आमचा अधिकार असून प्रशासनाने सुधारणा न केल्यास पुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मत मांडले.

आपली प्रतिक्रिया द्या