रेल्वेच्या तिकीट खिडकीवर वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने एटीव्हीएम मशीनसह आता यूटीएस (अनरीझर्व्ह तिकीट सिस्टिम) अॅपचा पर्याय पुढे केला आहे. वापरण्यास सहज व सुलभ असलेल्या या अॅपद्वारे जानेवारी 2024 ते मे 2024 अखेर रेल्वेला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आठ लाख 59 हजार ऑनलाईन तिकिटांचे वितरण करण्यात आले आहे. या माध्यमातून तिकीट छपाईच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.