पुण्याजवळील गावांना अवकाळी पावसाने झोडपले

11

सामना ऑनलाईन। पुणे

पुण्याजवळील भुकुम व त्याच्या शेजारील भागांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या या पावसामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान दुपारनंतर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

त्यातच सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. पण वादळी वाऱ्याच्या वेगामुळे हे मंडपही उखडले गेले. यामुळे लग्नाला आलेल्या मंडळीचा पुरता गोंधळ उडाला. अर्धा तास हा पाऊस भुकुम व ,मुळशी, पिरंगुट येथे कोसळत होता. त्यामुळे काही ठिकाणी पाणी जमा झाले होते.
या पावसाचा फटका उन्हाळी कांद्यालाही बसल्याने शेतकऱ्यांनी कांदा सडण्याची भीती व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या