
हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अती मुसळधार पावसाच्या दिलेल्या ईशाऱ्याप्रमाणे बुधवारी सकाळपासून संततधार सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला, तसेच गेल्या चोवीस तासांत जिह्यात 66.05 च्या सरासरीने 528.40 मी.मी. पाऊस पडला आहे. तर सर्वाधिक 121 मि.मी. पाऊस मालवण तालुक्यात पडला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यातही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यानाले तुडूंब भरून वाहत आहेत. गडनदी, अर्जुना, मुचकुंदी, पिंपळवाडी धरणे तुडूंब भरली आहेत. तर सिंधुदुर्गात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याची माहिती मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. बुधवारी सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी पाकसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसाने मालवण तालुक्याला झोडपून काढले. नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांसह शेतीही पाण्याखाली गेली आहे.
गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिह्यात सरासरी 70.14 मिमी इतका पाऊस पडला. सर्वाधिक 91.20 मिमी पाऊस खेड तालुक्यात पडला. त्यापाठोपाठ रत्नागिरीत 83.70 मिमी पाऊस पडला. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 65.40 मिमी, दापोली 80.10 मिमी, गुहागर 69.20 मिमी, चिपळूण 67.50 मिमी, संगमेश्वर 48.40 मिमी, लांजा 63.90 मिमी आणि राजापूर 61.90 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 121 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात 66.05 च्या सरासरीने एकूण 16853.80 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत 44 दिवसांत जिह्यात सर्वाधिक 2659 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मालवण तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यात दोडामार्ग 37 (1967), सावंतवाडी 76 (2234), वेंगुर्ला 90.40 (2154.80), कुडाळ 55 (1989), मालवण 121 (2780), कणकवली 24 (1979), देवगड 81 (1935), वैभववाडी 37 (1815), असा पाऊस झाला आहे.























































