
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान आहे असेही राज ठाकरे म्हणाले.
आज मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, लोक आपल्याला मतदान करतात. पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेमधून मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची. आपण काय सांगतो आहोत त्यांना की, मतदार याद्या स्वच्छ करा. पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये. मतदार याद्या स्वच्छ करा, अजून एक वर्ष लागलं तरी चालेल. एक वर्षानी निवडणुका घ्या. काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे. पण या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून लपून त्याच्यातन निवडणुका घ्यायच्या. मॅच तर फिक्स आहे.
एकनाथ शिंदेच खातं काय करतयत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याचं नाव नमो केंद्र नमो टरिझम सेंटर्स. ही नमो टुरिझम सेंटर्स शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर काढणार आहेत. जिथे फक्त आमच्या महाराजांच नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत. मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो. वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची. हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटगिरी चालू आहे. सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत काही असू देत आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाला पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे. याच्यासाठी ज्यांना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश कराव लागेल. मुंबई मधल्या जागा द्यायच्यात, अदाणीला देऊन टाका. तो बोट ठेवेल तिकडे जागा देतायत. हे सगळं येतं सत्तेतून असे राज ठाकरे म्हणाले. आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत दिल्ली पर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली आहे ती.
या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे. तो मतदार उन्हात तान्हात रांगेमध्ये उभा राहतोय. त्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण समजा रिझल्ट विचित्र लागणार असतील तो मताचा अपमान आहे. हे सगळं सुधारलं पाहिजे. हे सगळं नीट झालं पाहिजे. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल. पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले.





























































