राज ठाकरेंनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

46

सामना ऑनलाईन, कोलकाता

ईव्हीएम विरोधी मोहिमेत देशभरातील विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेतली. सचिवालयात त्यांनी ही भेट घेतली. यावेळी निवडणूक सुधारणा, मतपत्रिकेद्वारे मतदान यासह विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली. या आधी ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएम घालवा आणि मतपत्रिका परत आणा, अशी मनसेची भूमिका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या