
कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याने मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत अशी मागणी मनसेने अनेक वर्षांपासून लावून धरली होती. मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाने बंद करायला सुरुवात केल्यानंतर तो मुद्दा पुन्हा तापला आहे. मात्र जैन समाजाने कबुतरखाने बंद करण्यास विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यावर भाष्य केले. माणसं मेलेली चालतात, कबुतरं नाहीत, कोण हे जैन लोक? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी आज ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवून प्रसारमाध्यमांशी संवाद केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. कबुतरांना खाणे घालण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जैन समाजाला त्यांनी कानपिचक्या दिल्या. घरात चार उंदीर आले तर आपण काय करतो? गणपतीचं वाहन आहे म्हणून उंदीर घरात ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. आज रेल्वेखाली, खड्डय़ात माणसं जातात, माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का, असा बोचरा सवालही त्यांनी केला. कबुतरांच्या मुद्दय़ावरून राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण मनसेकडून प्रतिसाद मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आले, असे सांगतानाच, कुठे प्रतिसाद द्यायचा हे आम्हाला कळते, असे राज ठाकरे म्हणाले.
रस्ते बनवणे हा धंदा, ते खराब झालेच पाहिजेत
मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यावरही राज ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. रस्ते बनवणे हा आपल्याकडे धंदा आहे. ते खराब झालेच पाहिजेत. यात सर्व साटंलोटं आहे. रस्ते खराब झाले की खड्डे बुजवण्याचं टेंडर निघतं. पुन्हा खराब झाले की पुन्हा टेंडर निघतं, पण कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. अनेक वर्षांपासून ते सुरू आहे, असे राज ठाकरे म्हणाले. लोकं खड्डय़ात पडून मरत आहेत, तरीही लोक ज्यांच्यामुळे हे घडतंय त्यांनाच मतदान करत आहेत आणि कितीही खड्डय़ात घातलं तरी लोक मतदान करतात म्हणून तेही काही करत नाहीत, अशा लोकांना निवडून दिल तर चांगले रस्ते कसे मिळणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. बाहेरच्या राज्यातून येणाऱया लोकांना महाराष्ट्रातील खड्डे दिसतात, पण त्यांना त्यांचं राज्य खड्डय़ात गेलं हे दिसत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
अर्बन नक्षलवादापेक्षा टाऊन प्लॅनिंगवर लक्ष द्या
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेपूर्वी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत काय झाले याबद्दलही त्यांनी यावेळी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत आपण टाऊन प्लॅनिंगबाबत चर्चा करून ट्रफिक समस्या दूर करण्यास काही उपाय सुचवल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरात मोठय़ा प्र्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू आहेत, अनधिकृत गोष्टीही सुरू आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले. बाहेरून येणारे लोंढे मुंबईवर आदळत आहेत. आज जिथे 50 लोक राहत होती त्याठिकाणी 500 लोक राहत आहेत. माणसे वाढली, गाडय़ा वाढल्या, ट्रफिक वाढले. सर्व गोष्टी रस्त्यावर आल्या. त्या गाडय़ांसाठी पार्ंकग लॉट उभे करायला हवेत, छोटय़ा मैदानांखाली पार्ंकग लॉट बनवता येऊ शकतात, याचा आराखडा आपण मुख्यमंत्र्यांना दिला असे राज ठाकरे म्हणाले. या समस्यांवर तोडगा काढला नाही तर कठीण आहे, असा इशाराही त्यांनी दिला. अर्बन नक्षलवादापेक्षा आपल्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला हवे, आपण फक्त कबुतरं आणि हत्तींमध्ये अडकलो आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गाडय़ा कुठे पार्क करायच्या आणि कुठे नाहीत हे सर्वांना सम