हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे हे ठाणेकरांचे दैवत आहे. पण धर्मवीरांच्या नावाखाली गद्दार लोक राजकारण करीत असून हिंदुत्वाच्या बाता मारत आहेत. दिघे यांनी आनंद मठाला कधीही स्वतःचे नाव दिले नाही. पण गद्दारांनी मात्र आपले नाव देऊन त्यावर कब्जा मिळवला. याच आनंद मठामध्ये नोटादेखील उडवण्यात आल्या तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे