‘कुली’ने पहिल्या दिवशी 65 कोटी कमावले

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट 14 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘कुली’ने या कमाईसोबत बॉलीवूडसह अनेक चित्रपटांचा रेका@र्ड मोडून काढला आहे. 2025 मध्ये सर्वात गाजलेला विक्की कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचाही यामध्ये समावेश आहे. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘छावा’ नंबर वनवर होता. ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. रजनीकांतच्या ‘कुली’ने सर्वात जास्त कमाई करत आपल्याच दोन चित्रपटांचा म्हणजेच ‘जेलर’ आणि ‘वेट्टैयान’ या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले. ‘जेलर’ने ओपनिंग डेला 56.6 कोटी रुपये कमावले होते, तर ‘वैट्टैयान’ने पहिल्या दिवशी 37 कोटी रुपयांची कमाई केली होती, परंतु ‘कुली’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘कुली’ने जगभरात 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

रजनीकांतच्या चाहत्यांनी चेन्नईतील चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हजारो चाहत्यांनी थिएटरबाहेर एकच जल्लोष केला. काही चाहत्यांनी चित्रपटाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला.

रजनीकांत यांनी मानले चाहत्यांचे आभार

रजनीकांत यांनी 15 ऑगस्टला एक्सवर एक पोस्ट शेअर करून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांचे विशेष आभार मानले. तामीळनाडूचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, कमल हसन, ममूटी, मोहनलाल, वैरमुथु, इलियाराजा यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीमधील मित्रांचे आभार मानले. मला जिवंत ठेवणाऱ्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद, असेही रजनीकांत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.