मालवणातील शिवपुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची जबाबदारी टाळणाऱ्या मिंधे सरकारचा सर्वत्र निषेध होत आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाबे दणाणले आहेत. जावे तिथे त्यांना पुतळा प्रकरणावरून जाब विचारला जात आहे. आज तर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर हात जोडून माफी मागितली. शिवरायांच्या चरणांवर डोके ठेवून शंभर वेळा माफी मागतो, असे त्यांनी सांगितले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकोटचा परिसर संरक्षित केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.