
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गेल्या पाच वर्षांत सरकारला 400 कोटी रुपयांचा कर अदा केल्याची माहिती ट्रस्टचे सचिव चंप राय यांनी आज दिली. 5 फेब्रुवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2025 यादरम्यान हा आकडा आहे. यापैकी 270 कोटी रुपये जीएसटीपोटी देण्यात आले तर उर्वरित 130 कोटी रुपयांची रक्कम रक्कम कराच्या विविध श्रेणी अंतर्गत भरण्यात आल्याचे राय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अयोध्येत मोठ्या प्रमाणावर भाविक येत असून ट्रस्टसाठी देण्यात येणाऱ्या देणग्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाकुंभादरम्यान 1.26 कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे उघड झाले.
            
		





































    
    




















