माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे निधन

1012

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी राम प्रधान यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.प्रधान यांनी केंद्रीय गृह सचिव पद देखील भूषविले होते.  राम प्रधान यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह, संरक्षण, वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम प्रधान यांच्या निधनानंतर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की “त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली!”

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राम प्रधान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की “केंद्रीय गृहसचिव म्हणून त्यांनी पंजाब, आसाम अशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीत मोलाचे योगदान दिले. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर चौकशी आयोग त्यांच्याच अध्यक्षतेत स्थापित करण्यात आला. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांच्या जाण्याने हरपले आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

आपली प्रतिक्रिया द्या