रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नारायण राणे यांच्या वादग्रस्त विजयामुळे कायदेशीर वादात अडकलेली 2 हजार ईव्हीएम मुक्त करण्यासाठी पेंद्रीय निवडणूक आयोगाला शुक्रवारी उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम हवी आहेत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यानंतर न्यायालयाने संबंधित ईव्हीएम मुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट मार्गांनी विजय मिळवलेल्या नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, अशी मागणी करीत शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी पेंद्रीय निवडणूक आयोगातर्फे अॅड. अभिजित कुलकर्णी यांनी अंतरिम अर्ज केला आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱयांच्या ताब्यात असलेली 1944 बॅलट युनिट्स व 1944 पंट्रोल युनिट्स मुक्त करण्याची विनंती केली. पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान यंत्रे मुक्त करण्याची विनंती आयोगामार्फत करण्यात आली. ही विनंती न्यायमूर्ती कोतवाल यांनी मान्य केली. दरम्यान, राणेंच्या निवडीला आव्हान देणाऱया शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या याचिकेवर 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.