बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच सोमवारी ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यात चित्रपटातील लेडी सिंघम अभिनेत्री दीपिका पादुकोण उपस्थित नव्हती. त्यामुळे चाहते नाराज झाले. मात्र रणवीर या सोहळ्यात उपस्थित होता. यासोबत इतर कलाकारांनीही हजेरी लावली. यावेळी प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र रणवीरच्या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रेलर लाँचच्या वेळी रणवीर त्याची मुलगी आणि दीपिकाबद्दल बोलताना दिसला. मीडियाशी बोलताना रणवीर म्हणाला- मुलगी झाली हो…! दीपिका सध्या बाळासोबत बिझी आहे त्यामुळे ती येऊ शकली नाही. माझी ड्युटी रात्रीची आहे म्हणून मी आलो. आमच्या चित्रपटात अनेक स्टार्स आहेत. हा माझ्या लेकीचा म्हणजेच बेबी सिम्बाचा पहिला चित्रपट आहे. कारण सिंघमच्या शूटिंगच्या वेळी दीपिका गरोदर होती. लेडी सिंघम, सिम्बा आणि बेबी सिम्बा कडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा, असे तो यावेळी म्हणाला.
‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अजय देवगणसोबतच करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणने लेडी सिंघमची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता आहे.