
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरु असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवास मंगळवारी रश्मी ठाकरे यांनी भेट देऊन तुळजाभवानीची पूजा व आरती केली. तसेच खणानारळाने ओटीही भरली. महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस येऊ दे. बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे, असे साकडे रश्मी ठाकरे यांनी देवीला घातले. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, वाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघठक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महेश्वरी तरे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, नगरसेवक शहाजी खुस्पे, ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, माजी नगरसेवक मंदार विचारे, शाखाप्रमुख महेश ढोमणे आदी उपस्थित होते.
































































