म्हाडा मुख्यालयात उंदरांचा घरोबा, कर्मचारी हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात आता उंदरांनीच घरोबा केला आहे. या इमारतीत असलेल्या महत्त्वाच्या फाइल्स व इतर कागदपत्रांची उंदरांकडून नासधूस होण्याची भीती व्यक्त होत आहे. उंदरांनी विजेच्या तारा कुरतडण्याचे प्रकार घडल्यानेही चिंता व्यक्त होत आहे.

‘गृहनिर्माण भवन’मध्ये मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. या इमारतीत उंदरांनी उच्छाद मांडलाय. सकाळच्या वेळी कार्यालयात उंदरांच्या विष्ठsची अक्षरशः दुर्गंधी सुटलेली असते. सायंकाळी गर्दी कमी होताच उंदरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. उशिरापर्यंत थांबून काम करणाऱया कर्मचाऱयांना याचा त्रास सहन करावा लागतो. फाइल्स ठेवण्यासाठी प्रशासनाने कोटय़वधी रुपयांचे कॉम्पॅक्टर बसवले आहेत. मात्र कॉम्पॅक्टर नीट बंद नसल्यास त्यातही उंदीर घुसलेले असतात.

जागोजागी पिंजरे बसवणार

उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हाडाच्या पीपीडी विभागाने कार्यालयात ठिकठिकाणी उंदरांचे सापळे बसवले आहेत. तसेच काही ठिकाणी सिलिंग बंद केल्या आहेत. आणखी सापळे आणि रॅट ग्लू पॅड मागवण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

rat menace at mhada headquarters: staff worried over damaged files and electric wires

mhada’s griha nirman bhavan in bandra east is facing a severe rat infestation. mice are damaging important documents and electrical cables, causing concern among employees.