ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (वय – 86) हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत ठीक नसून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. मात्र हे वृत्त निराधार असल्याचे रतन टाटा यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून स्पष्ट केले आहे.
रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटा यांना सोमवारी पहाटे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे वृत्त सुरुवातीला आले होते. मात्र ही अफवा असल्याचे रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे.
एक्सवर एक निवेदन जारी करत रतन टाटा यांनी म्हटले की, माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव असून हे निराधार आहेत. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय बाबींमुळे रुग्णालयात तपासणी करत आहे. चिंतेचे काहीही कारण नाही.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024