शिक्षण, रोजगार निर्मिती आणि कृषी विकासावर भर देणार; साडवली गटातून शिवसेनेच्या नेहा मानेंना जनतेचा पाठिंबा

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

सहकार क्षेत्राचा मला अनुभव असल्याने पतसंस्थाच्या माध्यमातून महिला बचतगटांना कर्ज मिळवून देणे.महिला बचतगटांच्या उत्पादनावर बाजारपेठ मिळवून देणे.कृषी संस्थाच्या माध्यमातून शेतीचा विकास करणार आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचवणार आहे असे साडवली जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार नेहा रवींद्र माने यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री मंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने साडवली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत उमेदवार नेहा माने म्हणाल्या की,२०१२ ते २०१७ याकालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे.त्यावेळी मी शिक्षण समितीत होते.त्यामुळे शाळांच्या अडचणी,शैक्षणिक समस्या यांची मला चांगली जाणीव आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.मी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक आहे.त्यामुळे सहकार क्षेत्राचा मला अनुभव आहे.मी कृषी संस्थांच्या माध्यमातून शेतीचा विकास करणार आहे.

माजी पालकमंत्री रवींद्र माने यांचे कार्य

नेहा माने म्हणाल्या की, माझे पती रवींद्र माने या मतदारसंघात आमदार होते.पालकमंत्री होते.रवींद्र माने यांनी गावातील पाणी प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा कंबरेवर आणला.गावागावात रस्ते केले.रोजगारासाठी साडवलीत एमआयडीसी आणली होती आता त्या कंपन्या येऊन रोजगार कसा वाढेल हा प्रयत्न करणार आहे.