‘लाडकी बहीण’ योजनेच्या आडून मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा चेहरा हळूहळू उघड होत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेचा दीर्घकाळ लाभ मिळवायचा असेल, तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे लागेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. आता महायुतीतील आमदार रवी राणा यांनीही लाडकी बहीण योजनेवरून महिला वर्गाला दम भरला आहे.
हे वाचा – लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून आठवली बहीण लाडकी; विजय वडेट्टीवार यांनी घेतला महायुतीचा समाचार
अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक विधान केले. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेच्या दीड हजारांचे दुप्पट म्हणजेच तीन हजार रुपये करू. पण त्याआधी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्या मला आशीर्वाद देणार नाही त्यांच्या खात्यातून एक भाऊ म्हणून दीड हजार रुपयेही वापस काढून घेऊ, असे विधान रवी राणा यांनी केले. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
महायुतीला मतदान केले तरच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल – अजित पवार
‘लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई
दरम्यान, महायुती सरकारमध्ये सध्या प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या योजनेचं क्रेडिट घेण्यावरून युद्ध पेटलं आहे. ज्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या ‘क्रेडिट वॉर’वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ यांनी आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यावरून सध्या मिंधे गट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावरून या योजनेचे श्रेय कोणाला जाते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकारने ही योजना आणली आहे. मी अर्थसंकल्प सादर केला. आम्ही मिळून ही योजना तयार केली.’
लाडकी बहीण, लाडका भाऊ सांगा साहेब, मी काय खाऊ?, मुख्यमंत्र्यांच्या सभेत तृतीयपंथीयांचा टाहो!