साहित्य जगत- कलावंत लेखक

>> रविप्रकाश कुलकर्णी

नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांत चमकलेला अभिनेता विजय कदम यां चे 10 ऑगस्ट 2024 रो जी वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. त्या निमित्ताने त्याच्या कारकीर्दी ची यथायोग्य दखल घेतली गेलीगेली. हे वाचता ना त्यांच्या बद्दलच्या काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असं वाटलं. त्यातल्याच काही गोष्टी .

देवाच्या आळंदी ला जायला निघावं आणि चोराच्या आळंदी ला पोहोचावं तसं काहीसं विजय कदमच्या बाबतीत झालं असावं, हे माझं मत नसून नाटककार, कादंबरीकार श्री . ना . पेंडसे यांचं होतं. त्यांच्या ‘रथचक्र’ नाटका त विजय कदम यांनी पुंडय़ा ही भूमिका केली होती . ते काम पाहून पेंडसे इतके प्रभावित झाले की , त्यांनी म्हटलं होतं, हा उद्या चा काशिनाथ घाणेकर आहे, पण विजय कदम पुढे विनोदी भूमिकांकडे वळले आणि त्यातच अडकले. तेव्हा पेंडसे म्हणाले होते, “कुठे एक समर्थनायक आणि कुठे हशे गोळा करणारा नट!’’ पुढे ‘गारंबी चा बापू’ नव्या ने रंगभूमी वर येण्याची तया री सुरू झाली . तेव्हा पेंडसे यांनी विजय कदम यांचं नाव बापूसाठी सुचवलं होतं. दुर्दैदुर्दैवाने हे नाटक रंगभूमी वर येऊ शकलं नाही.

विजय हा गिरणगावातील रंगभूमी वरील कलावंत. अनेक धक्के खात पुरू बेर्डेच्र्डेया कळपात आला आणि मग ‘टूरटूर’नाटकाचा अविभाज्य भाग बनला . किंबहुना ती त्याची ओळख तो कायम मिरवत असे. लक्ष्मीकांत बेर्डेपार्डेपासून प्रशांत दामलेंपर्यंतर्यं एक सो एक किस्से त्याच्या आठवणी त होते. रंगात आला की , तो ‘टूरटूर’चे दि वस आठवून ते पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत असे. एकदा सांगली ला ‘टूरटूर’चा प्रयोग होता . त्यात पहिल्यांदाच एक गोरागोमटा मुलगा मद्राशाच्या भूमिकेत काम करणार होता . लक्ष्या ने त्या ला गंभीगं भीरपूर्वक म्हटलं, तुझा चेहरा काळा करून भागणार नाही , तर हातदेखील काळे करा वे लागतील. असे म्हणत त्याने रंगभूषा करणाऱ्याला डोळा मारला . रंगभूषा कारानेत्या गोऱ्या गोमट्या मुलाला नखशिखांत काळा करून टाकलं. प्रयोग रंगला आणि संपला . मेकअप उतरून सगळे जेवायला गेलेगेले. फक्त एकटा मद्राशाचं काम करणारा मुलगा सगळं अंग साफसूफ करण्यात अडकला .हा गोरा गोमटा मुलगा म्हणजे प्रशांत दामले!

…तर असा कायम गप्पांत आणि नाटकांत रमलेला विजय लेखनाच्या फंदात पडला , त्याची पण गोष्टच आहे. प्रसिद्ध
सिनेपत्रकार दिली पठाकूर यांच्या एका पुस्तकाला त्यांनी विजय कदम यांची प्रस्तावना घेतली . छापून आलेल्या पुस्तकातसआपली प्रस्तावना पा हून विजय खुश. आपलंना व पुस्तकात छापून आलंयाचं त्यांना अप्रूप वाटलं.आता आपणदेखी लिहायला हवं अस त्यांना वाटायला लागलं. त्या वेळी प्रकाश कुलकर्णी संपादित ‘वृत्तवृमा नस’मध्ये त्यां चे लेख येऊ ला गलेले.पुढे या लेखांचं पुस्तक आलं. कुर्ला येथील श्रीकल्प प्रकाशनतर्फे प्रकाशित झालं. त्यात अमिताभ बच्चनसंदर्भात एक लेख आहे, तो अजूनही मला आठवतो .

चांदिवली स्टुडिओत विजय कदम यांचं शूटिंग चाललेलं होतं आणि दुसदुऱ्या फ्लोअरवर अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’चं
शूटिंग चा ललेलं होतं. विजय कदम यांनी तेथील कुणाला तरी आपली अभशी ओळख करून द्या अशी गळ घातली .
तसंच या कलावंताचा आधी सीन पाहतो मग ओळख करून दे असं सांगितलं.

अमिताभ सराईतपणे काम करत होते. नेहमी प्रमाणे सगळे थक्क होऊन गेलेले मग सीनमध्ये खलनायक येऊन धमक्या द्यायला लागतो … आणि एका क्षणाला तो थांबतो . त्याला पुढचे संवाद आठवतच नाहीत. दिग्दर्शक मनमोहन देसाई ओरडतात, “कट कट…’’ खलनायक पुनित इस्सारवर देसाई डाफरायला लागतात. तेव्हा अमिताभ बच्चन मध्ये पडून मनमोहन देसाईंना म्हणतात, “मानलो , यही गलती मुझसे हो ती तो , तो क्या आप मुझे भी …’’ एवढं बोलून पुनित इस्सारकडे वळून म्हणतात, “देखिये, आपकी पहिली पिक्चर है, आप नर्व्हस मत हो ना . गलती हो ती है. मुझसे भी हो ती थी , होती है… आप फि र से इससे भी बढिया काम करने की हिम्मत रखे. रिटेक्स होंगे.आप घबराईये मत…’’ एवढे बोलून मनमोहन देसाईंकडे वळून म्हणाले, “ऑर्डरर्ड फॉर द शॉट’’ अर्थात पुढचा शॉट व्यवस्थित होतो .

एक बुजुर्ग कलावंत नवोदित कलावंताला कसं सांभाळून घेतो याचा जणू आदर्श धडा विजय कदमला पाहायला मिळाला. त्यांना गहिवरून आलं. त्यांचा स्नेही त्यांना म्हणाला , “चला , अमिताभजीं ना भेटूया .’’ तेव्हा विजय कदम म्हणाले, “मेरी और अमितजी की पहचान हो गयी .’
‘हलकंफुलकं’ या संग्रहात असे हृद्य प्रसंग आहेत.