2 हजारांच्या नोटा अजूनही जमा करू शकता

आरबीआयने दोन वर्षापूर्वी 2 हजारांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. परंतु अजूनही 3 कोटींहून जास्त नोटा म्हणजेच जवळपास 6,017 कोटी रुपये किंमतीच्या नोटा बाहेर आहेत. जर कोणाकडे 2 हजारांच्या नोटा असतील तर त्या जमा करता येऊ शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. यासाठी मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, कानपूर, जयपूर, बंगळुरू, अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, पटणा, तिरुवनंतपूरमसह देशातील 19 शहरांत नोटा जमा करण्यासाठी सुविधा केंद्रे उघडी आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे.