
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी 4 सप्टेंबर 2016 रोजी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अर्थतज्ञ आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे. आयएमएफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील. या मंडळात आयएमएफचे 24 कार्यकारी संचालक आहेत. जे संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवून महत्त्वाचे निर्णय घेतात. पटेल हे हिंदुस्थान, बांगलादेश, श्रीलंका आणि भुतानच्या गटाचे नेतृत्व करतील.