शेवटपर्यंत त्यांनी लोकांना हसवले.

>>वरद चव्हाण ( अभिनेते )

आज सकाळीच आपल्याला दुःखद बातमी मिळाली की, प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालंय. त्यांच्या आठवणी सांगायचं तर बाबांबरोबर त्यांनी पहिल्याच नाटकात काम केलं. या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. ते नाटक म्हणजे अर्थातच मोरुची मावशी. बाबा, प्रदीप काका आणि प्रशांत दामले या तिघांनी मिळून तेव्हा महाराष्ट्राला वेडं केलं होतं. हे मी आता नव्याने सांगायची गरज नाही. मोरुची मावशी नाटक रंगभूमीवर सादर व्हायचं तेव्हा मी खूप लहान होतो, पण या नाटकाची जेव्हा सीडी निघाली तेव्हा मी प्रदीप सरांचा खूप फोन झालो. त्यांची नाचण्याची विशेष शैली, त्यांचं कॉमेडी टायपिंग, दिसायला देखणे असा एक मराठीतला हॅडसम हिरो असं आपण त्यांना म्हणू शकतो आणि शेवटपर्यंत त्यांनी लोकांना खदखदून हसवलं. यात काहीच शंका नाही, पण दुर्दैवाने असं बोलावं लागतंय की, ते आज आपल्यात नाहीत. देव करो त्यांच्या आत्याला शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.