
कोरीयन ब्युटी ट्रेंडमधील काही गोष्टी आणि टिप्स या एकदम आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. या छोट्या टिप्स आपण घरी करुन पाहिल्या तरीही आपणही कोरीयन ग्लास स्किन घरबसल्या मिळवु शकतो. काहीही खर्च न करता केलेले उपाय हे कायमच महिला वर्गाच्या प्रथम पसंतीचे असतात. असेच घरगुती उपाय आपण बघुया. आपल्या आहारामध्ये रोज आपण भाताचा समावेश हमखास करतो. घरी रोज भात होत असल्याकारणाने, आता कोरीयन्स सारखी सुंदर त्वचा तुम्हीही अगदी घरबसल्या मिळवु शकता.
सध्याच्या घडीला सौंदर्य जगतामध्ये कोरीयन ब्युटी ट्रिटमेंटला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरीयन ब्युटी ट्रिटमेंट आता हिंदुस्थानातही फार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये कोरीयनसारखी ग्लास स्किनला मागणी आहे. महिलांसाठी किंवा मुलींसाठी नवीन आलेला ट्रेंड फाॅलो करण्याचा कल कायम असतो. असाच हा सध्याच्या घडीला कोरीयन ब्युटी ट्रेंड फाॅलो करण्याकडे महिलांचे लक्ष वेधलेले आहे.
आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला आवश्यक असणारी खनिजे, व्हिटॅमिन पुरवण्याचे काम हे भाताच्या मास्कमधून होत असते. भातामध्ये असलेली पोषक द्रव्ये ही खासकरुन चेहऱ्यावरील त्वचेसाठी पूरक आहेत.
चेहऱ्यावर भाताचा मास्क लावल्यामुळे, मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील जळजळही थांबते.
भाताच्या मास्कमुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळेच त्वचा नाजूक आणि कोमल होण्यास मदत होते.
भाताची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे, त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होते.
भाताची पेस्ट चेहऱ्यासाठी थंडावा देण्याचा महत्त्वाचे कार्य करते.
हा मास्क चेहऱ्यावर लावल्यामुळे सुरकुत्या येण्याचा संभव कमी होतो. तसेच त्वचेला येणारा लालसरपणा देखील कमी होतो.
घरच्या घरी फेसवाॅश करताना या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, जाणून घ्या
भाताचा मास्क चेहऱ्यावर कसा लावाल?
साहित्य
अर्धा कप- शिजवलेला भात
दोन टी स्पून- दूध किंवा दही
छोटा चमचा- मध
बदाम तेल- ३ ते ४ चमचे
कृती
तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यावा. त्यानंतर तो तांदूळ तसाच फ्रीजमध्ये ठेवावा. किमान दोन ते तीन दिवसानंतर, नेहमी आपण भात करतो त्याप्रमाणे भात करावा.
हा भात करताना यामध्ये पाणी जास्त मात्रेमध्ये घालावे. म्हणजे हा भात अधिक शिजवून घ्यावा.
भात पूर्णपणे थंड झाल्यावर, त्याची गरगरीत पेस्ट बनवा. त्यानंतर यामध्ये दूथ किंवा दही तुमच्या आवडीनुसार मिक्स करा.
त्यानंतर मध आणि बदाम तेल घालावे.
सर्व मिश्रण नीट एकजीव करावे. या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर नीट लावावा.
किमान पंधरा ते वीस मिनिटांनंतर, हा मास्क कोमट पाण्यानेच धुवावा.


























































