असं झालं तर…विमा योजनेचा बोनस चेक करायचा आहे…

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा
life-insurance

1

कोणत्याही विमा पॉलिसीवर दरवर्षी बोनस जमा होतो. बोनस दरवर्षी पॉलिसीच्या कामगिरीवर अवलंबून असतो आणि पॉलिसीच्या मुदतीत तो जमा होतो.

2

एलआयसी पॉलिसीवरील बोनस ऑनलाईन चेक करण्यासाठी एलआयसीच्या वेबसाइटला भेट द्या. एलआयसीच्या liciåieda.in या अधिपृत वेबसाइटवर जा.

3

‘कस्टमर पोर्टल’वर जाऊन युजर आयडी, पासवर्ड वापरून लॉग इन करा. ‘पॉलिसी स्टेटस’वर क्लिक करा. विशिष्ट पॉलिसी नंबर निवडून बोनस तपासा.

4

पॉलिसी स्टेटस आणि बोनस माहितीसाठी एसएमएस सुविधेचा वापर करा. एलआयसी कस्टमर अॅप डाऊनलोड करूनही माहिती मिळवता येते.

5

थेट एलआयसीच्या शाखेत जाऊनही तुम्ही बोनसची माहिती घेऊ शकता. लक्षात ठेवा तुमच्या पॉलिसीवर दरवर्षी बोनसची ठरावीक रक्कम जमा होत असते.