
भत्कम पुरणपोळी म्हणजे तांदळाच्या पीठापासून बनवलेली पारंपारिक पुरणपोळी. या पुरणपोळीचा उल्लेख शिवकालीन काळात झाला आहे.
साहित्य – तांदूळ, मीठ, तूप, गूळ, तांदळाचं पीठ, जायफळ
कृती –
तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतले. तांदूळ वाळल्यानंतर तुपात भाजून घ्या व नंतर मिक्सरमधून त्याची भरडी करा. त्यानंतर कढईत तूप घालून ती भरड टाका, त्यात गरम पाणी व किसलेला गूळ घाला. त्यात जायफळ, मीठ टाकून पुरण तयार करून घ्या. दुसऱ्या बाजूला कढईत गरम पाणी करून मीठ व तूप टाकून उकड काढून घ्या. पीठ हलके थंड झाले तकी चांगले मळून घ्या. या उकडीचे मोठे गोळे घेऊन त्याची वाटी तयार करा. त्यात पुरणाचा गोळा भरा व त्याचा गोळा तयार करा. त्याची पुरणपोळी लाटून गरम तव्यावर तूप घालून शेकून घ्या. अशा प्रकारे आपली भत्कम पुरणपोळी तयार झाली.



























































