
रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर-2’ द रिवेंज येत्या 19 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच धमाका केला आहे. चित्रपटाच्या पेड प्रीव्ह्यू शोजच्या अडवॉन्स्ड बुकिंगमध्ये आतापर्यंत 2.8 लाख तिकिटांची विक्री झाली असून यातून 21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंबईतील बोरिवलीमधील आयनॉक्स मेगाप्लेक्समध्ये रेक्लिनेर प्राईम कॅटेगरीचे 3 हजार 100 रुपयांपर्यंतचे तिकीट सोल्ड आऊट झाले आहे.
‘धुरंधर-2’ साठी मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपॉलीसने प्रीमियम सीट कॅटेगरी लाँच केली आहे. याची किंमत सामान्य तिकिटाच्या तुलनेत खूप जास्त आहे. मुंबईत एक तिकीट हजारो रुपयांना विकले जात आहे. हिंदुस्थानात सर्वात जास्त पेड प्रीह्यू कमाईचा रेकॉर्ड पवन कल्याणचा चित्रपट ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटाच्या नावावर आहे. या चित्रपटाने 25 कोटी रुपये कमावले होते.






























































