
चंदिगड आरएलएमध्ये झालेल्या गाड्यांच्या फॅन्सी ई-लिलावात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. 0001 या नंबरसाठी तब्बल 36 लाख 43 हजार रुपये मोजले. सीएच-1 डीए 0001 हा नंबर आतापर्यंतचा सर्वात महागडा फॅन्सी नंबर ठरला आहे. सीएच 01 डीए 0003 या नंबरसाठी 17 लाख 84 हजार रुपयांची बोली लागली. सीएच 01 डीए 0009 साठी 16 लाख 82 हजार, सीएच 01 डीए 0005 साठी 16 लाख 51 हजार, सीएट 01 डीए 0007 साठी 16 लाख 60 हजार, सीएच 01 डीए 0002 साठी 13 लाख 80 हजार, सीएच 01 डीए 9999 नंबरसाठी 10 लाख 25 हजार रुपयांची बोली लागली. याआधी झालेल्या लिलावातून सरकारला 2.26 रुपये मिळाले होते. या लिलावात एकूण 489 फॅन्सी नंबर्सचा लीलाव करण्यात आला.