पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशाला ‘भरती’; पालकांची पसंती १ हजार ९३७ ने विद्यार्थ्यांचा पट वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणेकरांसाठी एक गोड बातमी आहे. महापालिकेच्या शाळांना पालकांची पसंती मिळत असून प्रवेशाला ‘भरती’ आली आहे. २०२५-२६ या वर्षात १ हजार ९३७ ने विद्यार्थ्यांचा पट वाढल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता २७ हजार १३२ एवढी झाली असून ती आणखी वाढावी यासाठी शिक्षण विभागाने जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना, घरोघरी भेटी व विविध सुविधा यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांचा अवलंब करणार असल्याची घोषणा आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या १९४ शाळा असून त्यात ६९ पूर्व प्राथमिक, १०२ प्राथमिक व २३ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. कोरोनाचा काळ व त्यानंतरचा काही काळ याचा परिणाम महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्येवर झाला होता. ऑनलाइनच्या माध्यमातून काही वर्ग सुरू ठेवले होते. महापालिकेच्या शाळांचा दर्जा व पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाने घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले. त्याचा चांगला परिणाम झाला असून आता विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग खळा क्र५५ आझादनगर, तापणे (प) २०२४-२५ या वर्षात ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार १९५ एवढी होती. ती २०२५-२६ मध्ये २७ हजार १३२ एवढी झाली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शिक्षण विभागाची माहिती देत असताना विद्याथ्यांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट केले.

येत्या आर्थिक वर्षासाठी शिक्षण विभागाकरिता ३६३ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेने ६२ मॉडेल शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सरकारकडून ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही वाढणार आहे. नाविन्यपूर्ण योजना येत्या आर्थिक वर्षात सीबीएसी शाळा सुरू करणे मुलींसाठी कराटे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत प्रथमोपचार कक्षाची निर्मिती इयत्ता ९ वी आणि १० बीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी मुलींच्या सुरक्षिततेसाठी शौचालय बझार अलार्म प्रयोगिक तत्त्वावर हजेरीद्वारे नोंदणी संवाद आपल्या वृक्षांशी ड्राय वेस्ट बँक लैंगिक शिक्षण आहार शास्त्राबाबत कार्यशाळा.