
रेल्वे भरती मंडळाने 6180 तंत्रज्ञ पदांसाठीच्या भरतीची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नल ः 180 पदे, तंत्रज्ञ ग्रेड 3 ची 6000 पदे भरली जाणार आहेत. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार सर्व माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल 33 वर्ष असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे.