रेल्वेत 2865 पदांसाठी भरती

सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी गणेशोत्सवाआधीच एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने जबलपूर, भोपाळ आणि राजस्थानमधील कोटा विभागात 2 हजार 865 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in वर देण्यात आली आहे.