सिंधुदुर्ग : गोव्याच्या रेडकर हॉस्पिटलमध्ये कोरोना लस संशोधन, ICMR ची मान्यता

1210

हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना केंद्र सरकारच्या आयसीएमआर या संशोधन संस्थेने कोरोना लस संशोधनासाठी हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट बारा हॉस्पिटलची निवड केली आहे. त्यात गोवा, धारगळ येथील डॉ. सागर विवेक रेडकर संचालित रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचा समावेश आहे. विशेष म्हणजे डॉ. सागर रेडकर सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत.

गेली अनेक कर्षे मालवण येथे हृदयरोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ. विवेक रेडकर (मूळ गाव रेडी) यांचे डॉ. सागर हे सुपुत्र. डॉ. विवेक रेडकर, डॉ. सागर रेडकर आणि रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ‘कोरोना संशोधनाचा शोध’ या शोध प्रबधांची इटलीत होणाऱ्या आंतराष्ट्रीय कॉन्स्फरन्समध्ये निवड झाली होती. आता कोरोना लस संशोधनासाठी हॉस्पिटलच्या  झालेल्या निवडीने आणखी एक सन्मान रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला मिळाला असल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या संशोधनाकडे लक्ष लागले आहे.

कोरोना लस संशोधनासाठी आयसीएमआर संस्थेने तसेच केंद्रस्तरावरून रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची निवड केल्याच्या पार्श्वभूमीकर केंद्रीय आयुष मंत्री डॉ. श्रीपाद नाईक यानी गोवा, धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला भेट देत पाहणी केली. रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची झालेली ही निवड गोवा आणि कोकणवासीयांसाठी गौरवाची गोष्ट आहे.

गेल्या काही वर्षांत रेडकर हॉस्पिटलतर्फे डॉ. सागर रेडकर, डॉ. सुप्रिया रेडकर क डॉ. विवेक रेडकर यांनी जर्मनी, अमेरिका, दुबई, न्यूझीलंड येथे होणाऱ्या अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन कार्डिक असोसिएशन अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फरन्समध्ये आपले संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हॉस्पिटलला पुन्हा एकदा मान्यता मिळाली असून त्यांच्या इथिकल कमिटीमध्येही नामांकित डॉक्टर्स व संशोधक कार्यरत असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटलच्या प्रवीण सावंत यांनी दिली आहे.

लस संशोधनामध्ये गोपनीयता असणार

हिंदुस्थान सरकारच्या कोरोना लस संशोधनामध्ये गोपनीयता असल्यामुळे लसीसंबंधीच्या सर्व बातम्या या सरकारच्या आयसीएमआर साइटवरून देण्यात येणार असल्याचे डॉ. सागर रेडकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या