लॉटरीवर लादलेला अन्यायकारक जीएसटी कमी करा, लॉटरी विक्रेता सेनेची मागणी

विक्रेत्यांचा रोजगार वाचविण्यासाठी लॉटरीवर लादलेला 40 टक्के जीएसटी कमी करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेतर्फे लॉटरी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

अंध, अपंग, सुशिक्षित, अशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा व अनैतिक धंद्यांना आळा बसावा यासाठी तत्कालीन सरकारने लॉटरी सुरू केली होती. याची आठवण करून देऊन लॉटरीवर लावलेला 40 टक्के जीएसटी कमी करून राज्यातील विक्रेत्यांचा रोजगार वाचवावा यासंदर्भात शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी खजिनदार अविनाश सावंत व बबन सावंत उपस्थित होते.