लोकाधिकारची मराठी भाषा दिनासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यंदाही 27 फेब्रुवारी रोजी मरीन लाईन्स येथील मुंबई रुग्णालयाजवळील बिर्ला मातोश्री सभागृहात तो आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता शिवसेना भवन येथे महत्त्वाची बैठक महासंघाने बोलवली आहे.

लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या वेळी अनिल देसाई मराठी भाषा दिन कार्यक्रम आणि त्याच्या नियोजनाबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमाची तयारी व महत्त्वाच्या व्यवस्थांबाबत महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर हे याप्रसंगी माहिती देणार आहेत. या बैठकीला महासंघ तसेच विविध आस्थापनांमधील स्थानीय लोकाधिकार समित्यांच्या पदाधिकाऱयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाने केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.