मल्ल्याच्या कुटुंबीयांनी मागितली कोर्टातली कागदपत्रे

मल्ल्याची बायको पिंकी लालवानी वर्षाला 1.35 कोटी रुपये कमावते असा दावाही त्याने केलाय

सामना ऑनलाईन, मुंबई

विविध बँकांना 9 हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने आज 3 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. या प्रकरणात मल्ल्याच्या कुटुंबीयांसह एकूण 5 पक्षकारांनी हस्तक्षेप करून ‘ईडी’शी संबंधित असलेल्या कागदपत्रांची मागणी केल्याने पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला.

नवीन कायद्याचा आधार घेत ‘ईडी’ने जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत ती आपल्याला मिळावीत अशी मागणी मल्ल्याच्या वकिलांनी केली. परंतु न्यायाधीश आझमी यांनी तूर्त तसे आदेश न देता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 3 सप्टेंबरला ठेवली.