रिलायन्स इंडस्ट्रीने 42 हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून गेल्या वर्षभरात मोठय़ा प्रमाणात कॉस्ट कटिंग झाली. कंपनीने मनुष्यबळ कमी करण्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण अहवालात दिलेय. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीत एकूण कर्मचारी 3,89,000  होते, ते कमी होऊन 2024 मध्ये 3,47,000 इतके झाले. रिलायन्स ग्रुपने सर्वाधिक कॉस्ट कटिंग रिलायन्स रिटेल वर्टिकलमध्ये केलेय. रिलायन्स इंडस्ट्रीने मागच्या एका वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत 11 टक्के म्हणजेच 42 हजार कर्मचारी कपात केलेय. रिटेल सेक्टरमध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलेय.