
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिजा शुल्क वाढीच्या निर्णयाने मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १ लाख डॉलर (सुमारे ८८.१० लाख रुपये) इतकी वाढवण्याची घोषणा केली असून, ही वाढ २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. याचबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ही शुल्कवाढ केवळ नवीन अर्जदारांना लागू असेल, तर विद्यमान H-1B व्हिसाधारकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे विद्यमान व्हिसाधारकांना त्यांच्या व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. हा नियम फक्त नवीन H-1B व्हिसा अर्जांवर लागू होईल. यामुळे अनेक विद्यमान व्हिसाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे अमेरिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे H-1B व्हिसा प्रक्रिया अधिक कठीण आणि खर्चिक होण्याची शक्यता आहे, विशेषतः नवीन अर्जदारांसाठी.