
कडुलिंबाची काडी ः पांढरेशुभ्र दात दिसण्यासाठी कडुलिंबाच्या काडीचा वापर करा. दात घासण्यासाठी कडुलिंबाच्या काडीचा वापर केल्यास दात स्वच्छ आणि मजबूत होतात. कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. दात स्वच्छ ठेवण्यासोबत दातांच्या हिरड्याही मजबूत होतात.
माऊथवॉश करा ः दात घासले म्हणजे संपूर्ण तोंडाची स्वच्छता झाली आहे, असे समजू नका. जिभेची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि झोपेआधी दात व जीभ स्वच्छ करा. यासाठी माऊथवॉश करा म्हणजेच पाण्याच्या गुळण्या करा.