
केंद्र सरकारने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट इत्यादींसह सर्व लोकप्रिय मेसेजिंग आणि सोशल अॅप्ससाठी नवीन कडक नियम लागू केले आहेत. दूरसंचार विभागाच्या या नियमानुसार, तुमचे सिम ऑक्टिव्ह नसेल तर सोशल मीडिया अॅप्स वापरता येणार नाहीत. दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे की, हा नियम गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि फेक युजर्सला प्रतिबंध करण्यासाठी केला आहे.
नवीन नियमांनुसार, ‘टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर युजर एन्टीटीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱया मोबाईल अॅप कंपन्यांना युजर्सचे सिमकार्ड 90 दिवसांच्या सतत कालावधीसाठी जोडलेले आहे याची खात्री करावी लागेल. जर सिमकार्ड काढून टाकले किंवा निष्क्रिय झाले, तर डिव्हाईसमध्ये प्रवेश उपलब्ध राहणार नाही.
वेब ब्राऊझरवर व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम वापरणाऱया युजर्ससाठी सरकारने सुरक्षेचा आणखी एक स्तर जोडला आहे. तुम्ही अॅपमध्ये प्रवेश करताच युजर्स आपोआप लॉग आऊट होईल आणि पुन्हा लॉग इन करण्यासाठी क्यूआर कोड स्पॅन करण्यास सांगितले जाईल.
नियमात बदल कशासाठी?
बंद/इनएक्टिव नंबरचा गैरवापर होऊ नये. फसवणूक, बनावट खाती आणि स्पॅम थांबावेत. सायबर सुरक्षा मिळावी. युजर्सच्या ओळखीशी संबंधित पारदर्शकता वाढावी. बंद नंबर दुसऱ्या कोणाला पुन्हा जारी केल्यास सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ नये.
सध्या मोबाईलमध्ये मेसेजिंग अॅप्स कसे चालतात?
सध्या कोणत्याही मोबाईल नंबरला ओटीपीने व्हेरिफाय करून अॅप्स चालवले जातात. एकदा लॉगिन केल्यानंतर जरी नंबर बंद झाला तरी अॅप चालू राहते. मेसेजिंग अॅप जुन्या किंवा इनएक्टिव्ह नंबरवरही चालू राहते, जोपर्यंत युजस फोन बदलत नाही किंवा रीसेट करत नाही.
नवीन बदलानंतर काय…
जर तुमचा मोबाईल नंबर इनएक्टिव्ह/बंद झाला, तर मेसेजिंग अॅप्स आपोआप बंद होतील. लॉगिन फक्त नंबर ऑक्टिव्हेट झाल्यावरच शक्य होईल. म्हणजे सिम बंद तर अॅपही बंद. नंबर पुन्हा जारी झाल्यावर जुना युजर अॅप वापरू शकणार नाही. युजरला अॅप वापरण्यासाठी आपला नंबर चालू ठेवणे आवश्यक असेल.


























































