मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू; ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम पूर्ण

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या होत्या. मध्य रेल्वेच्या रखडंतीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, आता मध्य रल्वे रुळांवर आली असून ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आली असून मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. लवकरच वाहतूक सुरळीत होणार आहे.

ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक लोकल एकामागोमाग रखडल्या होत्या. त्यामुळे ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल धावत असतानाच ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे लोकल जागीच थांबली. मात्र, आता ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम झाले असून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.