
सामना ऑनलाईन, मुंबई
रिझर्व्ह बँकेची आज क्रेडीट पॉलिसीसंदर्भात बैठक झाली असून या बैठकीनंतर रेपो रेट पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट वाढल्याने त्याचा परिणाम कर्जदरावर झाला आहे. रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढल्याने यापुढे कर्ज अधिक महाग होणार आहेत. २०१३ सालानंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा जेव्हा रेपो रेटमध्ये सलग दोनवेळा वाढ करण्यात आली.
WATCH Live from Mumbai: RBI Governor Urijit Patel addresses the media https://t.co/KtBDOG8mGx
— ANI (@ANI) August 1, 2018
जून महिन्यामध्ये रेपो रेट ६ टक्क्यांवरून ६.२५ टक्के करण्यात आला होता. वाढती महागाई आणि विकासाचे जे आकडे सांगण्यात येत आहेत त्यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी कर्ज महाग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. रेपो रेट आता ६.२५ वरून ६.५० टक्के इतका झाला आहे. रेपो रेटचा हा दर मोदी सरकारच्या काळातील सर्वोच्च दर आहे.




























































