
केरळमध्ये कोची येथे उभ्या असलेल्या इराणी युद्धनौकेचे लपूनछपून चित्रीकरण केल्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार शंकर सीजी आणि मणी एस यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशाची सुरक्षा धोक्यात टाकण्याच्या हेतूने त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
इराणची युद्धनौका ‘आयआरआयएस लवण’ ही युद्धनौका तांत्रिक बिघाडामुळे कोची येथे उभी करण्यात आली आहे. कोचीन पोर्टच्या सदर्न कोल बर्थ येथे उच्च सुरक्षा झोनमध्ये दोघे पत्रकार शिरले आणि त्यांनी या जहाजाचे छायाचित्र आणि व्हिडीओ काढले. हेरगिरीच्या विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दोघांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

























































