पुन्हा हिमयुग येण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रातही पूर्णपणे बदल झाले आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये बदल झाले असून अवकाळी पाऊस, उन्हाळ्यात थंडी तर हिवाळ्यात गरमी जाणवत आहे. जागतिक हवामान बदल असेच सुरू राहिले तर जग पुन्हा एकदा हिमयुगात जाण्याचा धोका आहे अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर याचा फटका हिंदुस्थानला बसण्याची चिन्हे आहेत.

हिंदुस्थानसह संपूर्ण जगावर ऋतू बदलाचा विनाशकारी परिणाम होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या देशात पूर, थंडी आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटाचा धोका असतानाच संपूर्ण जागतिक ऋतुचक्राच्या प्रणालीच्या बिघाडाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी ज्वालामुखीचे उद्रेक, चक्रीवादळ, पूर येत आहे. हवामानशास्त्रज्ञ आणि तज्ञांच्या मते, हे क्यूबीओ (क्वासी-बायनियल ऑसिलेशन कोलॅप्स) चे ब्रेकडाउन आहे.त्यामुळे पृथ्वीपासून 20-30 किलोमीटरवर वाहणारा हवेचा प्रवाह उलटा झाला आहे. हवेचा प्रवाह साधारणपणे दर 28-30 महिन्यांनी दिशा बदलतो.

अनियमित वादळांचे संकट

अमेरिकेच्या हवामान खात्याच्या (एनओएए) आकडेवारीनुसार, वारे सामान्यपेक्षा 2-3 महिने आधीच पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने वळत आहेत. याचा परिणाम ला निना वर होईल, जो नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल. क्यूओबीच्या तुटण्यामुळे वादळे अनियमित होतील व हिंदुस्थानवर तीव्र परिणाम होईल.

तापमान वाढ आणि हिमस्खलन

बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खूप थंडी असेल़ फेब्रुवारीमध्ये तापमान अचानक 5 ते 7 अंशानी वाढेल. दिल्ली, पंजाब हरीयाणासह उत्तरेच्या राज्यात धुके आणि कश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि हिमस्खलनाचा धोका उद्वण्याची चिन्हे आहेत.