नेरळच्या उपसरपंचासह सर्व सदस्यांचे राजीनामे, भाजपच्या सरपंचावर भाजप सदस्यांचेच भ्रष्टाचाराचे आरोप

रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून परिचित असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सर्व 15 सदस्यांनी आज राजीनामे दिले. भाजपच्या सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सदस्यांनी राजीनामे दिले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

2019 मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक झाली. आता मुदत संपण्यास काही महिनेच शिल्लक असताना सत्ताधारी भाजप आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळची ओळख आहे. मात्र सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे ही ग्रामपंचायत वादग्रस्त ठरली आहे.

धुसफूस चव्हाट्यावर

सरपंच उषा पारधी आणि सदस्य यांच्यात धुसफूस सुरू होती. त्याचा उद्रेक होत आज पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यात आघाडीतील उपसरपंच मंगेश म्हसकर व सदस्य यांनी राजीनामे दिले. त्यानंतर विरोधी सदस्यांनीही राजीनामे दिले.