
अभिनेता रितेश देशमुख याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्टचा असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा आज फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या द्वारे रितेशने आज त्याच्या चित्रपटातील तगडी स्टारकास्ट व त्यांचे चित्रपटातील लूक जगासमोर आणले आहेत. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन अशी मोठी स्टारकास्ट आहे.
ज्या मातीने घडवलं त्या मातृभूमीसाठी रयतेने दाखवलेल्या विश्वासासाठी, आणि ज्याचं अहोरात्र स्वप्न पाहिलं त्या स्वराज्यासाठी! इतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार… हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सादर करत आहोत “राजा शिवाजी” चित्रपटाचा फर्स्ट लूक टीज़र”, अशी पोस्ट टाकत रितेशने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram





























































