
गुरुदेवजींच्या आशीर्वादाने चमत्कार घडला आणि माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज बोरिवली येथे एका धार्मिक कार्यक्रमात केले.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी घशाच्या समस्येने त्रस्त होते. आवाज नीट निघत नव्हता. मी औषधं घेत होते, पण त्याने काहीच फरक पडत नव्हता. हे मी गुरुदेवजींना सांगितले तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि आज मी स्पष्ट बोलू शकत आहे. हा मोठा चमत्कार आहे. मला खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे, असे रितू तावडे म्हणाल्या.




























































