गुजराती लोक बिहारचे मतदार, निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपची बेईमानी; तेजस्वी यादव यांची टीका

गुजराती लोक बिहारचे मतदार झाले आहेत असा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांना केला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजप बेईमानी करत आहे असेही यादव म्हणाले.

एका पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव म्हणाले की, आता गुजरातमधील लोक बिहारचे मतदार होत आहेत. भाजपचे प्रभारी भिखूभाई दलसाणिया हे पाटणाचे मतदार झाले आहेत. त्यांनी शेवटचा मतदान 2024 मध्ये गुजरातमध्ये केला होता, पण तरीही ते पाटणाचे मतदार आहेत. त्यांनी गुजरातमधील आपले नाव वगळून घेतले आहे, पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की पाच वर्षे पूर्ण झाली नाहीत आणि तुम्ही जागा बदलून मतदान सुरू केले आहे. बिहार निवडणुका झाल्यानंतर, नाव वगळून घेऊन ते कुठे जाणार? हा एक कट आहे जो तुम्हा सर्वांना समजून घ्यावा लागेल. भाजप निवडणूक आयोगाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात बेइमानी करत आहे असेही यादव म्हणाले.