लातूरमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ, बंद घर फोडून दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील विक्रम नगर भागातील अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घरात डल्ला मारला आहे. विक्रम नगर मधील रहिवासी श्रीराम मट्टेवाड मंगळवारी घराला कुलूप लाऊन बाहेर गेलेले होते. मात्र दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घरात परत आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातीलल्या कपाटातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, झुमके, कर्णफुले, दोन सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र तसेच इतर सोन्याचे व चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे.

दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.